ताज्या घडामोडी

वसमत तालुक्यात खरीप हंगामातील Trigger-1 अंतर्गत पंचनाम्याचे निर्देश; तहसील कार्यालयात बैठकीचे आयोजन

हरनामसिंग चव्हाण

वसमत तालुक्यात खरीप हंगामातील Trigger-1 अंतर्गत पंचनाम्याचे निर्देश; तहसील कार्यालयात बैठकीचे आयोजन

वसमत (विशेष प्रतिनिधी):
सन २०२६ च्या खरीप हंगामात Trigger-1 (प्रथम कळ) लागू झालेल्या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून विविध उपाययोजना व सवलती लागू करण्याबाबत शासन स्तरावर प्रशासकीय कार्यवाही वेगाने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर वसमत तालुक्यातील Trigger-1 अंतर्गत समाविष्ट गावांमध्ये बाधित पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
पंचनाम्याची कार्यवाही पारदर्शक आणि जलद व्हावी यासाठी बाधित शेतकऱ्यांकडे AgriStack Farmer ID उपलब्ध असल्यास त्याचा समावेश करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांकडे Farmer ID उपलब्ध नसेल, अशा प्रकरणांत आवश्यक ओळख पटवण्यासाठी आधार क्रमांकाची माहिती संकलित करून नोंदणी केली जाणार आहे. पंचनाम्याबाबतचा संपूर्ण संकलित अहवाल विहित नमुन्यात तात्काळ तहसील कार्यालयाकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी आणि प्रत्यक्ष कामाला गती देण्यासाठी गुरुवारी, १ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता तहसील कार्यालय, वसमत येथील सभागृहात एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना तहसीलदार सारंग चव्हाण यांनी सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्ष जाऊन पंचनामे पूर्ण करावेत आणि विहित वेळेत अहवाल सादर करावा, असे निर्देश दिले. या बैठकीस वसमतचे तालुका कृषी अधिकारी सुनील भिसे, गट विकास अधिकारी प्रफुल तोटावाड यांच्यासह तालुक्यातील महसूल, कृषी व पंचायत समिती विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(छाया: नागेश चव्हाण, वसमत)

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button