ताज्या घडामोडी

जनता दरबारातील अथांग गर्दी हीच माझ्या कामाची अन् विश्वासाची पावती: आमदार राजूभैया नवघरे

हरनामसिंग चव्हाण

जनता दरबारातील अथांग गर्दी हीच माझ्या कामाची अन् विश्वासाची पावती: आमदार राजूभैया नवघरे

लोकमंच टाईम्स: हरनामसिंग चव्हाण

वसमत:
“जनतेच्या अडीअडचणी फक्त ऐकून न घेता त्यावर तात्काळ व प्रत्यक्ष काय उपाययोजना करता येईल, यावर माझा मुख्य भर असतो. अडचणींचा डोंगर घेऊन आलेला नागरिक जेव्हा कार्यालयातून बाहेर पडताना समाधानाने जातो, त्याच्या चेहऱ्यावरील ते हास्य हीच माझ्या कामाची खरी पावती आहे,” असे प्रतिपादन वसमतचे आमदार राजूभैया नवघरे यांनी केले.
आमदार राजूभैया नवघरे यांच्या वसमत येथील संपर्क कार्यालयात आयोजित नियमित ‘जनता दरबारा’त आज नागरिकांची अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळाली. दरबाराच्या वेळी परिसरातील नागरिकांनी विविध समस्या आणि प्रश्नांबाबत आमदारांची भेट घेतली. नेहमीप्रमाणेच आजचा जनता दरबारही जनतेच्या उदंड प्रतिसादामुळे गजबजलेला दिसला. ही अथांग गर्दी म्हणजेच लोकप्रतिनिधीवर जनतेने दाखवलेल्या दृढ विश्वासाचे प्रतीक मानले जात आहे.
या जनता दरबाराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, ‘प्रॉब्लेम इथेच सॉल्व्ह होतात’ हा जनतेचा दृढ विश्वास! अनेक वर्षांपासून रेंगाळलेले प्रश्न किंवा प्रशासकीय अडचणी यांवर या ठिकाणी थेट अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तत्काळ तोडगा काढला जातो.
माता-भगिनींच्या प्रश्नांना प्रथम प्राधान्य:
जनता दरबारात मोठ्या संख्येने येणाऱ्या माता आणि भगिनींच्या समस्यांना प्राधान्यक्रमाने सोडवण्यावर आमदारांचा विशेष भर असतो. कौटुंबिक, सामाजिक अथवा वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या महिलांचे प्रश्न ऐकून घेऊन त्यांना दिलासा देणे व कामाची त्वरित पूर्तता करणे याला प्रथम प्राधान्य दिले जात असल्याचे यावेळी आमदार नवघरे यांनी सांगितले.
“जनसेवा हाच माझा ध्यास असून वसमत मतदारसंघातील प्रत्येक घटकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे माझे कर्तव्य आहे,” अशी ग्वाही यावेळी आमदार राजूभैया नवघरे यांनी दिली. जनता दरबाराच्या या उपक्रमामुळे वसमतमधील नागरिक आणि लोकप्रतिनिधींमधील ‘जनसंवाद’ अधिक मजबूत होत असल्याचे चित्र दिसत आहे.

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button