ताज्या घडामोडी

वसमत नगरपरिषदेच्या भूखंड घोटाळ्याविरोधात बेमुदत लक्ष वेद्धी आंदोलन सुरू

मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण

वसमत नगरपरिषदेच्या भूखंड घोटाळ्याविरोधात बेमुदत लक्ष वेद्धी आंदोलन सुरू

वसमत (लोकमंच टाईम्स प्रतिनिधी):
वसमत नगरपरिषदेच्या सर्वे नं. १८० मधील मालकीच्या भूखंडांचे बनावट दस्तऐवज तयार करून परस्पर विक्री केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या घोटाळ्यातील भू-माफिया, दुय्यम निबंधक व नगरपरिषदेच्या दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून मकोकाअंतर्गत कारवाई करावी, यासह विविध मागण्यांसाठी ‘अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती’च्या वतीने उपविभागीय अधिकारी (SDO) कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
नगरपरिषदेच्या रेकॉर्डमध्ये बेकायदेशीर फेरफार करून लाखो रुपयांचे भूखंड लाटल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. प्रशासनाने दिशाभूल करणारी फिर्याद न देता मुख्य सूत्रधारांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी जिल्हा उपाध्यक्ष आनंद खरे आणि मुनीरोद्दीन फारुकी यांनी केली असून, मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button