ताज्या घडामोडी

दारेफळमध्ये ‘लायन्स’चा सेवायज्ञ! भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद १५६ रुग्णांची नेत्रतपासणी; १५ मोतीबिंदूग्रस्त रुग्णांवर परभणीत होणार मोफत शस्त्रक्रिया

मुख्य संपादक: हरनामसिंग चव्हाण

दारेफळमध्ये ‘लायन्स’चा सेवायज्ञ! भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
१५६ रुग्णांची नेत्रतपासणी; १५ मोतीबिंदूग्रस्त रुग्णांवर परभणीत होणार मोफत शस्त्रक्रिया

वसमत (लोकमंच टाईम्स विशेष प्रतिनिधी):

ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यदायी दृष्टी मिळावी आणि नेत्रविकारांवर वेळीच उपचार व्हावेत, या सामाजिक उद्देशाने लायन्स नेत्र रुग्णालय, परभणी आणि लायन्स क्लब ऑफ बसमत प्राईड यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे दारेफळ (ता. वसमत) येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिराला ग्रामस्थांनी प्रचंड व उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सत्काराने कार्यक्रमाचा प्रारंभ
कार्यक्रमाच्या सुरवातीला दारेफळ येथील ज्येष्ठ समाजसेवक राजाभाऊ भालेराव आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांचा फेटा व पुष्पहार घालून भावूक नागरी सत्कार करण्यात आला. यासोबतच परभणी येथून आलेल्या तज्ज्ञ डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचाही सन्मान करून आभार व्यक्त करण्यात आले.
या संपूर्ण शिबिराचे यशस्वी नियोजन प्रोजेक्ट चेअरपर्सन सी. ए. एकनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले.
१५ रुग्णांना मिळणार नवीन दृष्टी!
दिवसभरात पार पडलेल्या या शिबिरात एकूण १५६ रुग्णांची सखोल नेत्रतपासणी करण्यात आली. यामध्ये प्राथमिक तपासणीअंती १५ रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले आहे. या सर्व १५ रुग्णांना पुढील अत्याधुनिक उपचार व मोफत शस्त्रक्रियेसाठी लायन्स नेत्र रुग्णालय, परभणी येथे पाठवले जाणार आहे.
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
या आरोग्य सोहळ्याला लायन्स क्लब ऑफ बसमत प्राईडचे अध्यक्ष संजीवकुमार बेंडके, माजी अध्यक्ष राजू सिद्दीकी, सचिव कल्याण कुरुंदकर, कोषाध्यक्ष संदीप चव्हाण, राजाराम जगताप, विजय लांडगु, अंबादास मनी, गौस बागवान, इम्रान नूर, प्रसाद लालपोतू, ॲड. अरुण आंबेकर, आलोक जाधव, विक्रम कुंटूरवार, बाळासाहेब बेले, मन्मथ सिद्धेवार, रोहित टेहरे, पिंटू बोखारे, योगेश चेपूरवार, अमित अवसरमल, आशीर्वाद इंगोले व दीपक कट्टेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच गावातील तंटामुक्ती अध्यक्ष रमेश भालेराव, पोलीस पाटील गुलाबराव पाटील, गोपीनाथ खरवडे, गणेश वाल्हेकर, प्रवीण अग्रवाल आणि पोस्टमास्तर भगवानराव भालेराव यांच्यासह दारेफळ येथील नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“ग्रामीण भागातील गोरगरीब व गरजू रुग्णांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणे हाच आमचा मुख्य ध्यास आहे. भविष्यातही लायन्स क्लब ऑफ बसमत प्राईडच्या वतीने असेच विविध सामाजिक व वैद्यकीय उपक्रम सातत्याने राबवले जातील.”
— आयोजक व प्रमुख पदाधिकारी, लायन्स क्लब ऑफ बसमत प्राईड

लोकमंच टाईम्स…..

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button