योगानंद महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून साजरी
मुख्य संपादक:हरनामसिंग चव्हाण

योगानंद महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून साजरी
वसमत
स्थानिक श्री योगानंद स्वामी कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. याच कार्यक्रमात थोर स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांची पुण्यतिथीही साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. संदीप गोरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वाचन व लेखनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये ‘लेखन प्रेरणा दिन’ उपक्रमाचे विशेष आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनावर आणि त्यांच्या विपुल साहित्य निर्मितीवर सविस्तर प्रकाश टाकण्यात आला.
महत्त्वाचे सहकार्य हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. बाळासाहेब भिंगोले, प्रा. डॉ. वर्षा दोडिया, प्रा. डॉ. गौतम कांबळे आणि प्रा. डॉ. मिरा नाकाडे यांनी विशेष पुढाकार घेतला.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

