श्रावण पहिल्या सोमवारी शिवेश्वर महादेव मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे फराळ वाटप; भाविकांची मोठी गर्दी!
मुख्य संपादक: हरनामसिंग चव्हाण

श्रावण पहिल्या सोमवारी शिवेश्वर महादेव मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे फराळ वाटप; भाविकांची मोठी गर्दी!

लोकमंच टाईम्स:हरनामसिंग चव्हाण
वसमत:
पवित्र श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी वसमत शहरात धार्मिक उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या शुभमुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, वसमतच्या वतीने स्टेशन रोड येथील प्रसिद्ध शिवेश्वर महादेव मंदिर परिसर येथे भाविकांसाठी विशेष फराळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी ८:०० ते १०:०० या वेळेत पार पडलेल्या या उपक्रमाला वसमतकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दर्शनासाठी आलेल्या हजारो शिवभक्तांनी फराळाचा लाभ घेतला.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरसेवक तथा गटनेते सचिन दगडू, धनंजय गोरे, दिलीप भोसले आणि वाहुळे, डोळसे,यांच्या प्रमुख उपस्थितीत फराळ वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.
मंदिरात सकाळपासूनच ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. धार्मिक सणांचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसने सामाजिक बांधिलकी जपत राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व स्थानिक भाविकांनी विशेष परिश्रम घेतले.

