अॅड. बळीराम पवार यांची हिंगोली जिल्हा परिषदेच्या विधिज्ञ पॅनलवर निवड!
हरनामसिंग चव्हाण

अॅड. बळीराम पवार यांची हिंगोली जिल्हा परिषदेच्या विधिज्ञ पॅनलवर निवड!
वसमत (लोकमंच टाईम्स प्रतिनिधी):
इंजणगाव (ता. वसमत) येथील रहिवासी अॅड. बळीराम लिंबाजी पवार यांची जिल्हा परिषद हिंगोली अंतर्गत वसमत न्यायालयासाठी ‘पॅनल विधिज्ञ’ म्हणून दिमाखदार निवड झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने (न्याय कक्ष) २०२६-२०२७ या वर्षाकरिता ही नियुक्ती केली असून, मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) विवेक गायकवाड (IAS) यांच्या स्वाक्षरीने हे आदेश पारित करण्यात आले आहेत. १ जुलै २०२६ ते ३० जून २०२७ या कार्यकाळात अॅड. पवार हे वसमत न्यायालयात जिल्हा परिषदेच्या वतीने विविध न्यायालयीन प्रकरणांमध्ये बाजू मांडतील व कायदेशीर सल्ला देतील.
या महत्त्वपूर्ण निवडीबद्दल अॅड. बळीराम पवार यांचे वसमत तालुका व इंजणगाव परिसरातून सर्वत्र जोरदार स्वागत व अभिनंदन होत आहे.

