ताज्या घडामोडी

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या उपस्थितीत नसरतपूर येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोग पारदर्शकपणे संपन्न

हरनामसिंग चव्हाण

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या उपस्थितीत नसरतपूर येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोग पारदर्शकपणे संपन्न

वसमत (लोकमंच टाईम्स प्रतिनिधी):
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर मौजे नसरतपूर (ता. वसमत) येथे आज सोयाबीन पिकाचा कापणी प्रयोग जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत पारदर्शक वातावरणात पार पडला.
शासनाच्या विहित कार्यपद्धतीनुसार शेतातील १० मीटर बाय १० मीटर क्षेत्र निश्चित करून त्यातील सोयाबीनची कापणी आणि मळणी करण्यात आली. त्यानंतर मिळालेल्या उत्पादनाचे अचूक वजन करून नोंदी घेण्यात आल्या. या प्रयोगाच्या नोंदींच्या आधारे संबंधित क्षेत्रातील पीक उत्पादनाचा अंदाज बांधला जातो, तसेच शेतकऱ्यांना पीक विमा नुकसानभरपाई निश्चित करण्यासाठी याचा मोठा उपयोग होतो.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी प्रत्यक्ष शेतात उपस्थित राहून संपूर्ण कापणी प्रक्रियेची बारकाईने पाहणी केली व कृषी विभागाकडून कार्यपद्धतीची सविस्तर माहिती घेतली. ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व नियमानुसार पार पडल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या पीक कापणी प्रयोगावेळी उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार सारंग चव्हाण, नायब तहसीलदार डॉ. विनोद डोणगावकर, पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी, मंडळ अधिकारी, तलाठी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहायक आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रयोगाचा सविस्तर अहवाल लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला जाईल, अशी माहिती उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी दिली.

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button