वसमतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा दणका! बाळू मामा ढोरे यांच्यावर वसमत विधानसभा समन्वयकपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी
हरनामसिंग चव्हाण

वसमतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा दणका! बाळू मामा ढोरे यांच्यावर वसमत विधानसभा समन्वयकपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी
वसमत (लोकमंच टाईम्स विशेष प्रतिनिधी):
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विधानसभा मतदारसंघनिहाय समन्वयकांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाच्या वसमत विधानसभा मतदारसंघाच्या समन्वयकपदी श्री. बाळू मामा ढोरे यांची निवड करण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार जारी करण्यात आलेल्या अधिकृत पत्रानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण करणे आणि पक्षसंघटन अधिक मजबूत करणे या मुख्य उद्देशाने ही निवड करण्यात आली आहे.
कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
श्री. बाळू मामा ढोरे यांची वसमत विधानसभा समन्वयकपदी नियुक्ती होताच वसमत तालुक्यासह संपूर्ण मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून व समर्थकांकडून त्यांचे जोरदार स्वागत केले जात आहे. त्यांच्या या निवडीमुळे तालुक्यातील पक्षाच्या कामाला नवी दिशा आणि अधिक गती मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.

