महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय, वसमत येथे सहशिक्षक श्री उद्धव ज्ञानेश्वरराव कदम यांचा ३७ वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्ती गौरव सोहळा संपन्न
मुख्य संपादक: हरनामसिंग चव्हाण

महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय, वसमत येथे सहशिक्षक श्री उद्धव ज्ञानेश्वरराव कदम यांचा ३७ वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्ती गौरव सोहळा संपन्न

लोकमंच टाईम्स:हरणामसिंग चव्हाण
वसमत:
श्री चैतन्य शिक्षण संस्था वसमत संचलित, महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय वसमत येथील सहशिक्षक श्री उद्धव ज्ञानेश्वरराव कदम सरांचा दीर्घ अशा ३७ वर्षांच्या प्रदीर्घ आणि समर्पित सेवेनंतर ‘सेवापूर्ती गौरव सोहळा’ रविवारी, ३० ऑगस्ट २०२६ रोजी महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय, वसमत येथे अत्यंत उत्साहात व भावूक वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री चैतन्य शिक्षण संस्था वसमतचे सचिव तथा मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीचे उपाध्यक्ष मा. ॲड. रामचंद्ररावजी बागल हे होते.
या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून वसमत विधानसभेचे आमदार मा. आ. राजूभैया नवघरे, श्री चैतन्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. ॲड. राजकुमार माचेवार, सहसचिव मा. श्री सुभाषअण्णा कंधारकर, उपाध्यक्ष मा. श्री बालाजीराव पार्डीकर, शा.स.अध्यक्ष मा. श्री विठ्ठलरावजी कदम, तसेच हिंगणघाट (जि. वर्धा) चे पोलीस उपअधिक्षक मा. श्री सुशिल काशिबाराव नायक यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
तसेच कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून यशवंत कॉलेज नांदेडचे भौतिकशास्त्र विभागाचे सेवानिवृत्त प्रमुख मा. श्री रामचंद्रराव आबाराव भोसले आणि निवृत्त गटशिक्षणाधिकारी मा. श्री तान्हाजीराव भोसले उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाच्या परंपरेनुसार झाली. उपस्थितांनी श्री उद्धव कदम सरांच्या ३७ वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव करत, त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये घडवलेले संस्कार व शिक्षणातील दिलेल्या योगदानाचे कौतुक केले. ३७ वर्षांची अखंड सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त होत असताना उपस्थितांनी कदम सरांना भावी आयुष्यासाठी उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
या गौरव सोहळ्याचे नियोजन महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, प्राथमिक व माध्यमिक विभाग तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी अत्यंत नियोजनबद्ध रीतीने केले होते. या सोहळ्यास परिसरातील नागरिक, स्नेही, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

