ताज्या घडामोडी

आमदार राजू भैया नवघरे यांच्याकडून विकासकामांची पाहणी व भोसले परिवारातर्फे सत्कार

मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण

आमदार राजू भैया नवघरे यांच्याकडून विकासकामांची पाहणी व भोसले परिवारातर्फे सत्कार

वसमत (लोकमंच टाईम्स: विशेष प्रतिनिधी) :
वसमत शहरातील कवठा रोड येथील श्री कृष्ण मंदिर परिसर सभागृहासाठी वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजू भैया नवघरे यांनी नुकताच भरीव निधी मंजूर केला होता. या मंजूर निधीतून पूर्ण झालेल्या व प्रस्तावित सभागृहाच्या बांधकामाची पाहणी आज आमदार राजू भैया नवघरे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन केली.
तसेच परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत घवघवीत यश संपादन करून संचालकपदी निवडून आल्याबद्दल श्री कृष्ण मंदिर परिसरात समस्त भोसले परिवार व श्री खेडकर बाबा यांच्या वतीने आमदार राजू भैया नवघरे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी आमदार नवघरे यांनी उपस्थितांशी संवाद साधत परिसराच्या विकासासाठी नेहमी कटिबद्ध असल्याचे सांगितले. या पाहणी व सत्कार सोहळ्याच्या वेळी समस्त भोसले परिवारातील सदस्य, स्थानिक नागरिक आणि गल्लीतील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छाया : नागेश चव्हाण, वसमत

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button