वसमत येथे भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन संपन्न
मुख्य संपादक हरणामसिंग चव्हाण

वसमत येथे भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन संपन्न
लोकमंच टाईम्स: हरणामसिंग चव्हाण
(
छाया: नागेश चव्हाण )
वसमत:
मालेगाव रोड, वसमत येथील भारतीय जनता पार्टीच्या नवीन जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा आज मोठ्या उत्साहात व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मा.ना.सौ. मेघनाताई बोर्डीकर (साकोरे) (राज्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बाल विकास) यांच्या शुभहस्ते पार पडले. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.श्री. अशोकरावजी चव्हाण साहेब (खासदार तथा माजी मुख्यमंत्री) उपस्थित होते.
या प्रसंगी विविध लोकप्रतिनिधी आणि पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यामध्ये
लोकप्रतिनिधी व वरिष्ठ नेते
मा.श्री. रामरावजी वडकुते (खासदार)
मा.श्री. तान्हाजी मुटकुळे (आमदार)
मा.प्रज्ञाताई सातव (आमदार)
मा.श्री. संजयभाऊ कौडगे (प्रदेश उपाध्यक्ष, भाजपा)
मा.श्री. चैतन्य बापू देशमुख (प्रदेश उपाध्यक्ष, भाजपा)
जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी:
मा.श्री. गजानन घुगे (जिल्हाध्यक्ष, हिंगोली)
मा.श्री. किशोरभाऊ देशमुख (जिल्हाध्यक्ष, नांदेड उत्तर)
मा.श्री. सुरेश भुमरे (जिल्हाध्यक्ष, परभणी ग्रामीण)
मा.श्री. शिवाजीराव भरोसे (जिल्हाध्यक्ष, परभणी शहर)
कार्यक्रमाचे आयोजक आतिश जयप्रकाश दांडेगावकर व भाजपा परिवार, वसमत विधानसभा मतदार संघ यांच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि नागरिकांचे आभार मानण्यात आले. या जनसंपर्क कार्यालयामुळे वसमत क्षेत्रातील नागरिकांचे प्रश्न सोडवणे आणि शासकीय योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे अधिक सोपे होईल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.
छाया:नागेश चव्हाण

