सेंदुरसना येथे श्री निळकंठेश्वर संस्थानामध्ये ११८ व्या अखंड हरिनाम सप्ताह, शिवमहापुराण कथा व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन
मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण

सेंदुरसना येथे श्री निळकंठेश्वर संस्थानामध्ये ११८ व्या अखंड हरिनाम सप्ताह, शिवमहापुराण कथा व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन

सेंदुरसना (लोकमंच टाईम्स तालुका औंढा नागनाथ):
येथील श्री निळकंठेश्वर संस्थानामध्ये श्री निळकंठेश्वर कृपा आणि श्री संत गु.ब्रं. मारुती महाराज दस्तापूरकर यांच्या आशीर्वादाने ११८ व्या अखंड हरिनाम सप्ताह, शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ, श्री राम, लक्ष्मण, सीता व हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा, कळशारोहण तसेच श्री शिवलीलामृत ग्रंथ पारायण व कीर्तन सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
हा धार्मिक सोहळा बुधवार, दिनांक १९ ऑगस्ट २०२६ ते बुधवार, दिनांक २६ ऑगस्ट २०२६ (श्रावण शु. ७ ते श्रावण शु. १३) या कालावधीत पार पडणार आहे.
सोहळ्याचे प्रमुख कार्यक्रम व वैशिष्ट्ये
शिवमहापुराण कथाज्ञानयज्ञ: दररोज दुपारी ११ ते ३ या वेळेत ह.भ.प. प्रकाश महाराज साते धारुरकर यांच्या मुखातून शिवमहापुराण कथा मांडली जाईल.
मूर्ती प्राणप्रतिष्ठा व महाप्रसाद: दिनांक २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ६ वाजता सामूहिक काकडा आरती, सकाळी ७ ते ९ वाजता श्री ची मिरवणूक, १० वाजता महापूजा, त्यानंतर काल्याचे कीर्तन व महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल.
अन्नदान कथा झाल्यानंतर दररोज दुपारी ३ ते ५ या वेळेत अन्नदान (महाप्रसाद) व्यवस्था करण्यात आली आहे.
दररोज रात्रीचे कीर्तन सेवा (वेळ: रात्री ८ ते ११)
बुधवार, १९/०८/२०२६: ह.भ.प. कबीर महाराज अतार (सातारा)
गुरुवार, २०/०८/२०२६: ह.भ.प. काशिनाथ महाराज माने (कुसळकर)
शुक्रवार, २१/०८/२०२६: ह.भ.प. कविराज महाराज झावरे (पुणे)
शनिवार, २२/०८/२०२६: ह.भ.प. प्रकाश महाराज साते (धारुरकर)
रविवार, २३/०८/२०२६ ह.भ.प. बाळू महाराज गिरगावकर
सोमवार, २४/०८/२०२६ ह.भ.प. संतोष महाराज आढावणे (युवाचार्य)
मंगळवार, २५/०८/२०२६ ह.भ.प. अंकुर महाराज साखरे (कीर्तन केशरी)
सांगता व विशेष सोहळा (बुधवार, २६/०८/२०२६)
दुपारी ३ ते ४ (दि. २५/०८/२०२६): ह.भ.प. विठ्ठलगुरु महाराज जोशी शिरडकर (सांगता पुजेचे कीर्तन)
सकाळी १० ते ११: ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पोखर्णीकर (श्रद्धास्थान)
सकाळी ११ ते १ (काल्याचे कीर्तन): ह.भ.प. महाराष्ट्र भूषण अच्युत महाराज दस्तापूरकर
या सर्व धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रमांचा परिसरातील सर्व भावीक भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त गावकरी मंडळी, सेंदुरसना (ता. औंढा ना., जि. हिंगोली) यांच्या वतीने करण्यात आले आहे.

