कै. बाळासाहेब सवराते यांच्या कुटुंबीयांना जिल्हा बँकेकडून २ लाखांचा धनादेश (मदतीचा हात)
हरनामसिंग चव्हाण

कै. बाळासाहेब सवराते यांच्या कुटुंबीयांना जिल्हा बँकेकडून २ लाखांचा धनादेश (मदतीचा हात)
लोकमंच टाईम्स मुख्य संपादक: हरनामसिंग चव्हाण
आलेगाव (पूर्णा):
पूर्णा तालुक्यातील आलेगाव येथील मयत कर्मचारी कै. बाळासाहेब नामदेवराव सवराते यांच्या निधनानंतर, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत त्यांच्या कुटुंबीयांना जिल्हा बँकेच्या वतीने मदतीचा हात देण्यात आला आहे.
बँकेच्या अधिकाऱ्यांनी कै. बाळासाहेब सवराते यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष जाऊन त्यांच्या कुटुंबीयांना ₹२,००,०००/- (दोन लाख रुपये) रक्कमेचा धनादेश सुपूर्द केला व बँक प्रशासनाच्या वतीने सवराते कुटुंबाचे सांत्वन केले.
या प्रसंगी जिल्हा बँकेचे पूर्णा तालुक्याचे संचालक श्री. नंदकुमारजी दाखोरे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुरुंदकर साहेब, तालुका लोन ऑफिसर व्ही. एम. देसाई तसेच आलेगाव शाखेचे व्यवस्थापक श्री. विठ्ठल भोसले उपस्थित होते.
याशिवाय गावातील प्रतिष्ठित नागरिक शिवाजीराव सवराते, गावचे सरपंच, चेअरमन आणि जिल्हा बँक शाखा आलेगावचे कर्मचारी या वेळी प्रमुख उपस्थित होते.

