वसमतमध्ये आमदारांच्या नवीन ‘सूट लूक’ची चर्चा: सोशल मीडियावर धुमाकूळ, राजकीय वर्तुळात शपथविधीच्या ड्रेसची रंगली चर्चा!
मुख्य संपादक: हरनामसिंग चव्हाण

वसमतमध्ये आमदारांच्या नवीन ‘सूट लूक’ची चर्चा: सोशल मीडियावर धुमाकूळ, राजकीय वर्तुळात शपथविधीच्या ड्रेसची रंगली चर्चा!
लोकमंच टाईम्स:हरनामसिंग चव्हाण
वसमत मतदारसंघाचे आमदार राजू भय्या नवघरे सध्या एका नव्या अवतारात समोर आले असून, त्यांच्या या नवीन ‘सूट लूक’ने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियासह न्यूज चॅनेल आणि कार्यकर्त्यांमध्ये या लूकचीच जोरदार चर्चा सुरू आहे.
मंत्रिपदाच्या चर्चांना उधाण
सध्या राजकीय गोटात एका मोठ्या फेरबदलाचे व मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहत आहेत. अशातच पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून आमदार नवघरे यांना हिरवी झेंडी मिळाल्याचे बोलले जात असून, “दादाचा शब्द ताई पाळणार” अशा चर्चांना उधाण आले आहे. कार्यकर्त्यांमध्ये “भावी नामदार मंत्री महोदय लवकरच भेटणार” असा उत्साह पाहायला मिळत आहे.
शपथविधीची तयारी?
आमदारांचा हा कॉर्पोरेट आणि रुबाबदार सूट लूक पाहून मतदार संघात गमतीशीर आणि तितकीच उत्सुकतेची चर्चा रंगली आहे. “आमदारांनी थेट मंत्रीपदाच्या शपथविधीचाच ड्रेस शिवून घेतला की काय?” असा सूर सर्वसामान्यांमध्ये निघत आहे.
नवीन लूकमुळे वसमतच्या राजकारणात एक नवीन रंग भरला गेला असून, येणाऱ्या काळात या चर्चेला अधिकृत पाठबळ मिळते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

