ताज्या घडामोडी

वसमत-जवळा बाजार येथे स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त ८४ शेतकऱ्यांना ‘कृषिरत्न’ पुरस्कार व चार्जिंग पंपांचे वाटप आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या हस्ते शेतकऱ्यांचा गौरव; कृषी उत्पन्न बाजार समिती जवळा बाजारचा स्तुत्य उपक्रम

मुख्य संपादक: हरनामसिंग चव्हाण

वसमत-जवळा बाजार येथे स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त ८४ शेतकऱ्यांना ‘कृषिरत्न’ पुरस्कार व चार्जिंग पंपांचे वाटप
आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या हस्ते शेतकऱ्यांचा गौरव; कृषी उत्पन्न बाजार समिती जवळा बाजारचा स्तुत्य उपक्रम

लोकमंच टाईम्स:मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण

औंढा नागनाथ तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती, जवळा बाजार येथे स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार श्री. राजूभैय्या नवघरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जवळा बाजार कार्यक्षेत्रातील ८४ प्रगतीशील शेतकऱ्यांना ‘कृषिरत्न पुरस्कार’, सन्मानचिन्ह आणि शेतीकामासाठी अत्यंत उपयुक्त असे चार्जिंगवर चालणारे फवारणी पंप (स्प्रेअर) वाटप करून सन्मानित करण्यात आले.
कृषी क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या कष्टातून समृद्धीकडे जाणाऱ्या प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उपनिबंधक (DDR) कार्यालयाचे अधीक्षक श्री. पठाडे साहेब, वरिष्ठ शास्त्रज्ञ श्री. अंगद गोरे, ‘राजूभैय्या नवघरे सेवा प्रतिष्ठान’चे अध्यक्ष श्री. बाळूमामा ढोरे, हिंगोलीचे माजी सभापती श्री. राजाभाऊ मुसळे, श्री. कपिलजी सोनटक्के, श्री. संजय दराडे, श्री. बाबासाहेब गायकवाड, श्री. प्रवीण टोम्पे, श्री. गोपाळभाऊ मगर, श्री. आदित्य आहेर, श्री. फारुख भाई, श्री. स्वामिल, श्री. गणेश वालेकर, श्री. देविदास चव्हाण, श्री. संभाजी पाटील चव्हाण, श्री. राजू कुटे, श्री. किरण आहेर, श्री. बाळासाहेब बारहाते, श्री. चांदू पाटील इंगोले आणि श्री. राजेश सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमा दरम्यान आमदार राजूभैय्या नवघरे यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा पुनरुच्चार करत बाजार समितीच्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
या सोहळ्यास पुरस्कार प्राप्त शेतकरी, जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती, सन्माननीय संचालक मंडळ, बाजार समितीचे सर्व कर्मचारी आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छाया: नागेश चव्हाण, वसमत

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button