ताज्या घडामोडी

नगरसेवक राजेश पवार यांनी माजी मंत्री डॉ. जयप्रकाशजी मुंदडा यांना दिल्या गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा

मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण

नगरसेवक राजेश पवार यांनी माजी मंत्री डॉ. जयप्रकाशजी मुंदडा यांना दिल्या गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा

हिंगोली / विशेष वृत्त:
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून हिंगोलीतील जिल्ह्यातील वसमत येथील लोकप्रिय नगरसेवक राजेश पवार यांनी आपले राजकीय मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान, माजी मंत्री डॉ. जयप्रकाशजी मुंदडा साहेब यांची भेट घेऊन त्यांना गुरुपौर्णिमेच्या भावुक वातावरणात हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या वेळी नगरसेवक राजेश पवार यांनी डॉ. मुंदडा साहेबांचे पुष्पगुच्छ देऊन आदराने पूजन केले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.
मार्कदर्शक व गुरुंशी असलेल्या नात्याबद्दल बोलताना नगरसेवक राजेश पवार म्हणाले,
“डॉ. जयप्रकाशजी मुंदडा साहेब हे केवळ माझे राजकीय नेते नाहीत, तर माझे मार्गदर्शक आणि गुरु आहेत. सार्वजनिक आयुष्यात काम करताना समाजकारण कसे करावे, जनतेच्या प्रश्नांसाठी कसे लढायचे आणि निष्ठेने कार्य कसे पूर्ण करायचे, याचे धडे मला साहेबांच्या सहवासातूनच मिळाले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आज मी जनतेची सेवा सक्षमपणे करू शकत आहे.”
या प्रसंगी डॉ. जयप्रकाशजी मुंदडा साहेब यांनीही राजेश पवार यांच्या भावी राजकीय व सामाजिक वाटचालीस उदंड आयुष्याच्या आणि यशाच्या शुभेच्छा दिल्या.

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button