वसमत येथील प्रसिद्ध सिद्धेश्वर मंदिर लासिन मठ येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अन्नदानाचा उपक्रम संपन्न
मुख्य संपादक: हरनामसिंग चव्हाण

वसमत येथील प्रसिद्ध सिद्धेश्वर मंदिर लासिन मठ येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अन्नदानाचा उपक्रम संपन्न
वसमत (विशेष प्रतिनिधी):
वसमत येथील श्री सिद्धेश्वर मंदिर लासिन मठ संस्थान येथे गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात करण्यात आले. याप्रसंगी परिसरातील सर्व सद्भक्त मंडळाने श्री गुरुंचे दर्शन व आशीर्वाद घेतले.
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून लासिन मठ संस्थानच्या वतीने महाप्रसाद (अन्नदान) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
या पावन प्रसंगी
परमपूज्य १०८ श्री बसव शिवलिंग शिवाचार्य महाराज
यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडले. या कार्यक्रमास सिद्धेश्वर मंदिर लासिन मठ संस्थानचे सर्व सद्भक्त मंडळ, ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने हा सोहळा अत्यंत शांततेत व भक्तिभावाने पार पडला.
छायाचित्र नागेश चव्हाण, वसमत
