नगरपरिषद कर्मचाऱ्यांची भव्य मोटरसायकल रॅली; ‘हर घर तिरंगा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ
लोकमंच टाईम्स मुख्य संपादक: हरणामसिंग चव्हाण

नगरपरिषद कर्मचाऱ्यांची भव्य मोटरसायकल रॅली; ‘हर घर तिरंगा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ
लोकमंच टाईम्स: हरणामसिंग चव्हाण
दिनांक १४ ऑगस्ट २०२६
‘हर घर तिरंगा’ अभियानानिमित्त आज नगरपरिषदेच्या वतीने कर्मचाऱ्यांची एक भव्य मोटरसायकल रॅली उत्साहात पार पडली. या रॅलीमध्ये नगरपरिषदेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन देशभक्तीचा संदेश दिला.
रॅलीचा शुभारंभ ऐतिहासिक ‘शिवतीर्थ’ येथून झाला. नगरपरिषदेच्या मा. मुख्याधिकारी यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीस रवाना केले. त्यानंतर ही रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून व चौकातून देशभक्तीपर घोषणा देत मार्गस्थ झाली. या उपक्रमामुळे संपूर्ण शहरात उत्साहाचे व देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
या प्रसंगी कार्यालयीन अधीक्षक डी. जी. दळवी, अरविंद शिकारी, दाजीबा भोसले, ओंकार कदम, अजय गायकवाड, संजय केजकर, जितेंद्र रोकडे, नंदकुमार पिंगळे यांच्यासह नगरपरिषदेचे इतर सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ व्हावी आणि प्रत्येकाने आपल्या घरावर अभिमानाने तिरंगा फडकवावा, या उद्देशाने या रॅलीचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. शहरातील नागरिकांनी ठिकठिकाणी रॅलीचे स्वागत केले.

