जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या घोषणेचे वारे वाहताच इच्छुकांची धावपळ सुरू; नागरिकांचा सवाल—”दुष्काळात कुठे असतात हे नेते?”
लोकमंच टाईम्स मुख्य संपादक: हरनामसिंग चव्हाण

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या घोषणेचे वारे वाहताच इच्छुकांची धावपळ सुरू; नागरिकांचा सवाल—”दुष्काळात कुठे असतात हे नेते?”
लोकमंच टाईम्स मुख्य संपादक: हरनामसिंग चव्हाण
वसमत तालुका:
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकां सर्वोच न्यायलय चा हिरवा कंदील मिळाल्यावर संभाव्य बदलाच्या आणि घोषणेच्या चर्चांना वेग येताच, वसमत तालुक्यातील राजकीय वातावरण अचानक तापले आहे. निवडणुकांचे समीकरण डोळ्यांसमोर ठेवून इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच गावभेट आणि फोनवरून नागरिकांशी संपर्क साधण्याचा सपाटा लावला आहे. मात्र, या तथाकथित ‘जनसंपर्का’वर तालुक्यातील सुजाण नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत मोठा सवाल उपस्थित केला आहे.
नागरिकांचा रोखठोक सवाल: “फक्त निवडणुकीच्या तोंडावरच का आठवण येते?”
वर्षभर गावानं अनेक समस्यांचा सामना केला, पण या काळात फिरकलेही नाहीत. आता निवडणुका जवळ आल्यावर हेच इच्छुक उमेदवार घराघरांमध्ये आणि फोनवरून भेटीगाठी घेण्याचा देखावा करत आहेत. “जर हे खरोखरच जनसेवक आहेत, तर निवडणुका जवळ आल्यावरच यांना नागरिकांची आपुलकी कशी काय आठवते?” असा संतप्त सवाल वसमत तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक विचारत आहेत.
दुष्काळजन्य परिस्थितीत पाठ फिरवणारे नेते आता निवडणुकीसाठी सरसावले!
वसमत तालुक्यात सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई, जनावरांचा चारा आणि पिकांचे नुकसान अशा भीषण संकटात सापडलेल्या जनतेला आधार देण्यास कोणताही मोठा नेता किंवा इच्छुक उमेदवार पुढे आला नाही.
खंत व्यक्त: दुष्काळ असो वा इतर संकट, जेव्हा जनतेला खऱ्या मदतीची गरज असते, तेव्हा हे नेते फिरकतही नाहीत; हीच मोठी खंत आज प्रत्येक नागरिकाच्या मनात आहे.
स्वार्थाचा अजेंडा: आता मात्र केवळ स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी आणि इलेक्शन जिंकण्यासाठी हा सर्व ‘पुढाकार’ व दिखाऊ धडपड सुरू असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे.
वजनदार चर्चा: जनता आता सुजाण झालीय!
गावोगावी सध्या एकच चर्चा रंगली आहे की, दुष्काळात पाठ फिरवणारे आणि संकटकाळात गायब राहणारे हेच नेते आता मतांचे झोळी पसरण्यासाठी दारात उभे ठाकणार आहेत. परंतु, आता वसमत तालुक्यातील जनता सुजाण झाली असून, या दिखाऊ संपर्काला आणि मतलबी राजकारणाला मतदार कसा प्रतिसाद देतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. निवडणुकांच्या तोंडावर सुरू झालेली ही ‘नेत्यांची कसरत’ मतदारांना कितपत भुरळ पाडेल, हे येणारा काळच ठरवेल!

