वसमत येथील जिल्हा परिषद मैदान वाचवण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण

वसमत येथील जिल्हा परिषद मैदान वाचवण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

वसमत (प्रतिनिधी लोकमंच टाईम्स ):
वसमत शहरातील एकमेव खुले सार्वजनिक मैदान असलेले जिल्हा परिषद मैदान वाचवण्यासाठी सर्व समाज बांधवांच्या वतीने मा. उपविभागीय अधिकारी (उपविभागीय कार्यालय, वसमत, ता. वसमत, जि. हिंगोली) यांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वसमत येथील जिल्हा परिषद मैदान हे शहरातील एकमेव खुले सार्वजनिक मैदान असून ते वसमतचे वैभव मानले जाते. या मैदानावर हिंदू समाजाचा दसरा यांसारखे अनेक मोठे सण व सार्वजनिक कार्यक्रम पार पडतात. सध्या या मैदानासंदर्भात मा. न्यायालयात वाद प्रकरण सुरु आहे.
असे असतानाही मैदानावर विकासाच्या नावाखाली काही कारवाया केल्या जात आहेत, जे अत्यंत चुकीचे असून यामुळे नागरिकांमध्ये तीव्र रोष निर्माण होत आहे. या कारवाईमुळे भविष्यात नागरिकांमध्ये असंतोष किंवा रोष निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदन देणारे अर्जदार / सर्व समाज बांधव:
१. गोविंद महादेव वावळे
२. रमेश पञे
३. ॲड. रंगनाथ देशमूख
४. संजय वर्धापुरे
५. सत्यनारायण नखाते
६. नरवाडे मनिष अर्जुनराव
सदरील निवेदनाच्या प्रती उपविभागीय पोलीस अधिकारी (वसमत), पोलीस निरीक्षक (पोलीस स्टेशन वसमत शहर) आणि तहसीलदार (तहसील कार्यालय, वसमत) यांनाही माहिती व पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आल्या आहेत.

