ताज्या घडामोडी

डॉ. संत रामराव बापू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र विनम्र अभिवादन

मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण

डॉ. संत रामराव बापू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र विनम्र अभिवादन

विशेष प्रतिनिधी
अध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात अनमोल व बहुमूल्य योगदान देणारे, बंजारा समाजाचे श्रद्धास्थान, धर्मगुरू, बालब्रह्मचारी व तपस्वी डॉ. संत रामराव बापू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात त्यांना आदरांजली व विनम्र अभिवादन करण्यात येत आहे.
बंजारा समाजाच्या उन्नतीसाठी, व्यसनमुक्तीसाठी आणि सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्यासाठी संत रामराव बापू महाराजांनी आयुष्यभर कार्य केले. अध्यात्माच्या माध्यमातून त्यांनी समाजाला सन्मार्गावर आणण्याचे मोठे कार्य केले असून त्यांचा विचार आणि वारसा आजही कोट्यवधी अनुयायांना प्रेरणा देत आहे.
या प्रसंगी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख श्री. रामेश्वर नाईक यांनी संत रामराव बापू महाराज यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.
महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी अध्यात्मिक कार्यक्रम, समाजोपयोगी उपक्रम आणि अन्नदानाचे आयोजन करण्यात आले आहे.

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button