ताज्या घडामोडी

शिवेश्वर नागरी सहकारी बँकेचा सभासदांना मोठा दिलासा; १०% लाभांश जाहीर!

मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण

शिवेश्वर नागरी सहकारी बँकेचा सभासदांना मोठा दिलासा; १०% लाभांश जाहीर!

लोकमंच टाईम्स: हरनामसिंग चव्हाण

वसमत:
श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक लिमिटेड, वसमतची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (२३ ऑगस्ट २०२६) अत्यंत उत्साहात पार पडली. बँकेचे अध्यक्ष शिवदास बोड्डेवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत सभासदांसाठी १० टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. अध्यक्ष बोड्डेवार यांनी ही घोषणा करताच उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या गजावरात या निर्णयाचे जोरदार स्वागत केले.
वसमत येथील मुख्य कार्यालयात पार पडलेल्या या सभेत बँकेच्या आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या दैदीप्यमान प्रगतीचा लेखाजोखा मांडण्यात आला. ३१ मार्च २०२६ अखेर बँकेची आर्थिक स्थिती पुढीलप्रमाणे मजबूत झाली आहे:
वसूल भागभांडवल: ₹८ कोटी ५ लाख ६४ हजार ३५०
राखीव व इतर निधी: ₹१९ कोटी २२ लाख ६ हजार ९०९
एकूण ठेवी: ₹१९४ कोटी ४५ लाख २० हजार
एकूण गुंतवणूक: ₹६९ कोटी ३२ लाख १४ हजार १५२
कर्जवाटप: ₹११७ कोटी ८२ लाख ८१ हजार १३५
एकूण निव्वळ नफा: ₹१ कोटी ७१ लाख १२ हजार २५९
बँकेच्या प्रगतीचा आलेख सतत उंचावत ठेवल्याबद्दल संचालक मंडळ आणि व्यवस्थापनाचे कौतुक करण्यात आले.
या महत्त्वपूर्ण सभेला बँकेचे उपाध्यक्ष भारत नामपल्ली, संचालक विनोद झंवर, दत्तात्रय दलाल, नागनाथराव कोंपलवार, बालासाहेब जाधव, लक्ष्मीकांत कोसलगे, शेख मैनुद्दीन संदलजी, नारायण लासीनकर, वसंत चेपूरवार, बालाजी माळवतकर, डॉ. धोंडीराम पार्डीकर, श्रीमती शकुंतलाबाई देवणे, सौ. रुपाली दगडू, अ‍ॅड. दीपक कट्टेकर, रमाकांत भागानगरे,सचिन दगडू अ‍ॅड. वाघीले आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक कल्याणकर, सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर कवटे, किशन पानंधोंडे, संजीव बेंडके, रघुत्तम पांडे, पवन खंडारे, मुळे दत्तात्रय, शिवानंद सोनटक्के, गणेश गरुड, ताजपाशा पठाण यांच्यासह बँकेचे अधिकारी, कर्मचारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button