ताज्या घडामोडी

वसमतच्या सिराज कॉलनीत उत्साहात पार पडला पंचशील ध्वजारोहण सोहळा

मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण

वसमतच्या सिराज कॉलनीत उत्साहात पार पडला पंचशील ध्वजारोहण सोहळा

लोकमंच टाईम्स: हरनामसिंग चव्हाण

वसमत (विशेष प्रतिनिधी):
वसमत शहरातील सिराज कॉलनी येथील विश्वशांती बुद्ध विहार येथे रविवारी, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी पंचशील ध्वजारोहण कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पार पडला.
पूज्य भंते पय्याबोधी महाथेरो यांच्या पावन हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला सत्कारमूर्ती म्हणून वसमतचे उपनगराध्यक्ष राजेंद्रकुमार एंगडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. तसेच मुंबई येथील युवा उद्योजक बालाजी शिवभगत, विजय कुमार एंगडे, आविष्कार मनोहरे, गौतम वाव्हळे व रणधीर तेलगोटे यांची विशेष उपस्थिती होती.
या प्रसंगी विविध क्षेत्रातील नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि महिला मंडळाच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. उपस्थित मान्यवरांनी पंचशील ध्वजाला वंदन करून समाजात शांतता, सामाजिक एकता आणि बंधुभाव जोपासण्याचा महत्त्वपूर्ण संदेश दिला.
सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन रमाई महिला मंडळ, सिराज कॉलनी, वसमत यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या सदस्यांनी व स्थानिक नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले.
(छाया: नागेश चव्हाण, वसमत)

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button