महाराष्ट्र शासनाचा सिकलीगर समाजासाठी ऐतिहासिक पुढाकार; मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादामुळे समाज मुख्यधारेत येणार!
मुख्य संपादक: हरनामसिंग चव्हाण

🚨 अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी 🚨
महाराष्ट्र शासनाचा सिकलीगर समाजासाठी ऐतिहासिक पुढाकार; मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादामुळे समाज मुख्यधारेत येणार!
विशेष प्रतिनिधी:मुंबई
महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय श्री. देवेंद्र जी फडणवीस साहेब यांच्या आशीर्वादाने सिकलीगर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांना विकासाच्या मुख्यधारेत आणण्यासाठी शासन पातळीवर अत्यंत वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून, आरोग्य दूत तथा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष प्रमुख आदरणीय श्री. रामेश्वर जी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज मुंबई येथे ‘सिकलीगर समाज अभ्यास समिती’ (महाराष्ट्र शासन) अंतर्गत एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
बैठकीतील मुख्य निर्णय व महत्त्वाचे मुद्दे
प्रत्येक विभागाचा अभ्यास महाराष्ट्रातील ६ विभागांचा विचार करता, लवकरच दर दिवशी २ विभागांतील सिकलीगर समाजाची विशेष बैठक घेतली जाईल.
मुंबईत बेठक समाजातील विविध गंभीर समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी, योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी आणि समाजाला थेट न्याय देण्यासाठी मुंबई येथील बंगल्यावर सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची लवकरच एक उच्चस्तरीय बैठक आयोजित केली जाणार आहे.
विशेष उपस्थिती व सहभाग
या मोहिमेचे नियोजन व मार्गदर्शन श्री. जगदीश जी सकवान सर आणि श्री. रवींद्र जी राठोड सर यांच्या सक्रिय सहभागातून होणार आहे.
आजच्या बैठकीस सिकलीगर सिख विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष हरनामसिंग चव्हाण व त्यांचे शिष्टमंडळ, तसेच सिख सिकलीगर समाज संस्थेचे अध्यक्ष तेजा सिंग बावरी हे विशेष रूपाने उपस्थित होते.
घोर उपेक्षेचा सामना करणाऱ्या सिकलीगर समाजाचे प्रश्न सुटावेत आणि प्रत्येकाला हक्क व न्याय मिळावा, यासाठी मुख्यमंत्री महोदय स्वतः अत्यंत आग्रही आहेत. समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि प्रगतीसाठी उचललेले हे एक क्रांतिकारी आणि ऐतिहासिक पाऊल ठरत आहे!
जय हिंद! जय महाराष्ट्र!

