ताज्या घडामोडी

वसमत पंचायत समितीच्या नूतन गटशिक्षणाधिकारी पदी योगेश पाटील रुजू; आमदार राजू भैया नवघरे व शिक्षकांकडून जंगी स्वागत

मुख्य संपादक: हरनामसिंग चव्हाण

वसमत पंचायत समितीच्या नूतन गटशिक्षणाधिकारी पदी योगेश पाटील रुजू; आमदार राजू भैया नवघरे व शिक्षकांकडून जंगी स्वागत

लोकमंच टाईम्स: हरनामसिंग चव्हाण

वसमत: वसमत पंचायत समितीच्या शिक्षण विभागात नूतन गटशिक्षणाधिकारी (BDO – Education) म्हणून योगेश किशनराव पाटील यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या पदभार स्वीकारण्याने वसमत तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात नव्या अध्यायाचा प्रारंभ झाला असून, सर्व स्तरातून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात येत आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर वसमत विधानसभेचे आमदार राजू भैया नवघरे यांनी नूतन गटशिक्षणाधिकारी योगेश पाटील यांची भेट घेऊन त्यांचा विशेष सत्कार केला व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याचबरोबर पंचायत समितीच्या शिक्षण क्षेत्रातील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या वतीनेही शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
योगेश पाटील यांच्या नियुक्तीमुळे वसमत तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्तेला नवीन दिशा आणि ऊर्जा मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे, शाळांचा दर्जा सुधारणे आणि शिक्षकांच्या अडचणी प्राधान्याने सोडवणे यावर आपला भर असेल, असा मनोदय नूतन गटशिक्षणाधिकारी यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
सोहळ्यातील प्रमुख उपस्थिती
प्रमुख मान्यवर: मदन कदम सर, सूर्यकांत देशमुख, रामेश्वर ढोणे, इम्रान पटेल, मारुती गोरे, उमाकांत आंबोरे, यासीन शेख, उद्धव दाभाडे, एकनाथ राखोडे आणि गजानन नवघरे सर.
शिक्षकवृंद: भोसले सर, साखरे सर, ढोणे सर, काळबांडे सर, मुंडे सर, अंभोरे सर, कबाडे सर, शेख सर, आगलावे सर, सोनकांबळे सर, भवाळे सर, वाळवंटे सर, गोरे सर, काळे सर, आचार्य सर व धाडवे सर.
शिक्षिकावृंद: देशमुख मॅडम, वानखेडे मॅडम व दावलबाजे मॅडम.
या सत्कार सोहळ्याला वसमत पंचायत समिती शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच तालुक्यातील शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सर्व उपस्थितांनी नूतन गटशिक्षणाधिकारी योगेश पाटील यांना यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
छाया:नागेश चव्हाण

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button