ताज्या घडामोडी
हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याविरोधात वसमतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक; उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन
मुख्य संपादक: हरनामसिंग चव्हाण

हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याविरोधात वसमतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक; उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन
वसमत (विशेष प्रतिनिधी):
- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत व प्रसारमाध्यमांद्वारे राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याबाबत अत्यंत अवमानकारक व आक्षेपार्ह शब्दप्रयोग केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, वसमत शहराच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन वसमतचे उपविभागीय अधिकारी (SDM) यांना देण्यात आले.
निनावदतातील ठळक मुद्दे व मागण्या:
महिला लोकप्रतिनिधीचा अवमान: लोकशाहीत राजकीय मतभेद असू शकतात, मात्र राज्याच्या उपमुख्यमंत्री व वरिष्ठ महिला लोकप्रतिनिधी सुनेत्राताई पवार यांच्याविषयी हिन दर्जाची व अवमानकारक भाषा वापरणे हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला शोभणारे नाही. या वक्तव्यामुळे महिला सन्मानाला धक्का पोहोचला आहे.
कायदेशीर चौकशी व गुन्हा दाखल करण्याची मागणी: हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याची प्रशासनाने तातडीने वस्तुनिष्ठ चौकशी करावी. चौकशीत कायद्याचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास त्यांच्याविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण: अशा प्रक्षोभक व आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे समाजात चुकीचा संदेश जाऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी व प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.
हे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वसमत शहराध्यक्ष यांच्या लेटरपेड वर देण्यात आले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक, विविध सेलचे अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लक्ष्मीकांत नवघरे पाटील यांच्या मार्गदर्शना खाली
निवेदनावर खालील पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या व उपस्थिती होती
आनंद रमेश बडवणे शहराध्यक्ष, सचिन दगडू गट नेते ,अमजद खान,दीपक कटेकर,राजकुमार येंगडे , विनोद चव्हाण , भब्बन खंदारे , धनंजय गोरे, मुबीन पठाण, बा. शं. अल्लार ,गौतम वाहुळे , यन आय पठाण,ऐजाज , हरुन दालवाले, संकेत नामपली ,धीरज कुलथे,सूरज फेगडे , भिमराव सरकटे, एजाज कुरेशी.
व इतर पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते

