ताज्या घडामोडी

ॲड. रंगनाथ देशमुख यांची ‘राज्यमंत्री मेघना दीदी बोर्डीकर मित्र मंडळ’ च्या लीगल ॲडव्हायझर पदी निवड

मुख्य संपादक: हरनामसिंग चव्हाण

ॲड. रंगनाथ देशमुख यांची ‘राज्यमंत्री मेघना दीदी बोर्डीकर मित्र मंडळ’ च्या लीगल ॲडव्हायझर पदी निवड

लोकमंच टाईम्स:हरनामसिंग चव्हाण

वसमत:
सामाजिक व कायदेशीर क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आणि कौशल्याची दखल घेत, ‘राज्यमंत्री मेघना दीदी बोर्डीकर मित्र मंडळ’ (ता. वसमत, जि. हिंगोली) च्या अधिकृत लीगल ॲडव्हायझर (कायदेशीर सल्लागार) पदी ॲड. रंगनाथ देशमुख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
याबाबतचे अधिकृत नियुक्ती पत्र मंडळाचे अध्यक्ष श्री संदीप कदम पाटील यांच्या स्वाक्षरीने नुकतेच मेघना दीदी बोर्डीकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. ॲड. देशमुख यांचा कायदेशीर क्षेत्रातील गाढा अभ्यास, अचूक मार्गदर्शन आणि समाजोपयोगी वृत्ती यामुळे मित्र मंडळाच्या सामाजिक व जनहिताच्या उद्दिष्टांना अधिक बळ मिळेल, असा विश्वास या प्रसंगी व्यक्त करण्यात आला.
या नियुक्तीबद्दल ॲड. रंगनाथ देशमुख यांचे मित्र मंडळाच्या वतीने, सर्व सहकाऱ्यांकडून व वसमत परिसरातून मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button