ताज्या घडामोडी

श्री नीलकंठेश्वर संस्थान, सेंदुरसना येथे ११८ व्या श्री अखंड हरिनाम सप्ताह व शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन; भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

मुख्य संपादक: हरनामसिंग चव्हाण

श्री नीलकंठेश्वर संस्थान, सेंदुरसना येथे ११८ व्या श्री अखंड हरिनाम सप्ताह व शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन; भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

लोकमंच टाईम्स: हरनामसिंग चव्हाण

सेंदुरसना (ता. औंढा नागनाथ):
येथील श्री नीलकंठेश्वर संस्थान येथे श्री नीलकंठेश्वर कृपेने आणि श्री संत गु. ब्रह्मलीन मारुती महाराज दस्तापूरकर यांच्या शुभ आशीर्वादाने ११८ व्या श्री अखंड हरिनाम सप्ताह, शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ, श्री राम, लक्ष्मण, सीता, हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कळशारोहण सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा दिनांक १९ ऑगस्ट २०२६ ते २६ ऑगस्ट २०२६ या कालावधीत मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
या सोहळ्यात दररोज सकाळी ४ ते ६ काकडा भजन, ६ ते ७ श्री चा अभिषेक, ७ ते ९ शिवलीलामृत पारायण, ९ ते १० गाथा भजन, ११ ते ३ शिवमहापुराण कथा, ३ ते ६ महाप्रसाद, ६ ते ७ हरिपाठ आणि रात्री ८ ते १०:३० या वेळेत हरिर्किर्तन व नंतर जागर असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतील.
सप्ताहातील प्रमुख कार्यक्रम व किर्तन सेवा:
१९/०८/२०२६ (बुधवार): ह.भ.प. कबिर महाराज अतार (सातारा)
२०/०८/२०२६ (गुरुवार): ह.भ.प. काशिनाथ महाराज माने (फुलकळसकर)
२१/०८/२०२६ (शुक्रवार): ह.भ.प. कविराज महाराज झावरे (पुणे)
२२/०८/२०२६ (शनिवार): ह.भ.प. प्रकाश महाराज साठे (धारूरकर)
२३/०८/२०२६ (रविवार): ह.भ.प. बाळू महाराज गिरगावकर
२४/०८/२०२६ (सोमवार): ह.भ.प. संतोष महाराज आढावणे (युवाचार्य)
२५/०८/२०२६ (मंगळवार): ह.भ.प. अक्रूर महाराज साखरे (किर्तन केसरी)
शिवमहापुराण कथाकार: ह.भ.प. प्रकाश महाराज साठे (धारूरकर)
विशेष सांगता सोहळा (बुधवार, दि. २६/०८/२०२६):
सकाळी ६ वा.: सामूहिक काकडा आरती
सकाळी ७ ते ९ वा.: श्री ची मिरवणूक
सकाळी ९ ते ११ वा.: ह.भ.प. महाराष्ट्र भूषण अच्युत महाराज दस्तापूरकर यांचे काल्याचे किर्तन
सकाळी ११ वा. नंतर: भव्य महाप्रसाद वितरण
या सोहळ्यादरम्यान दररोज दुपारी ३ ते ६ या वेळेत अन्नदान महाप्रसाद होणार असून, अन्नदाते म्हणून गावकरी मंडळी, सेंदुरसना हे सेवा बजावणार आहेत.
या भक्तिमय सोहळ्याचा व महाप्रसादाचा परिसरातील समस्त भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त गावकरी मंडळी, सेंदुरसना ता. औंढा (नाग.) जि. हिंगोली यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button