हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब कार्यक्रमाचे समन्वयक आदरणीय रामेश्वरजी नाईक यांच्या प्रयत्नांना मोठे यश; देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या मागण्यांवर शासन स्तरावर वेगवान हालचाली!
मुख्य संपादक

हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब कार्यक्रमाचे समन्वयक आदरणीय रामेश्वरजी नाईक यांच्या प्रयत्नांना मोठे यश; देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या मागण्यांवर शासन स्तरावर वेगवान हालचाली!

लोकमंच टाईम्स:हरनामसिंग चव्हाण
मुंबई:
महाराष्ट्रातील उपेक्षित आणि वंचित सिकलीगर समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अत्यंत ऐतिहासिक व क्रांतीकारी पाऊल उचलले आहे. ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब’ महाराष्ट्र शासन आयोजित कार्यक्रमाचे समन्वयक, सिख कॉर्डिनेशन कमेटी महाराष्ट्र शासन समन्वयक तथा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे प्रमुख आदरणीय श्री. रामेश्वरजी नाईक यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत गुरु नानक नाम लेवा संगत—सिख, सिकलीगर, बंजारा, लबाना, मोहियल, वाल्मिकी व इतर सर्व गुरुमान्य समाजांना एका व्यासपीठावर आणून जगात एकतेचा सर्वसमावेशक संदेश दिला होता. कार्यक्रमाच्या आयोजनात सर्व घटकांना समान न्याय देण्यासोबतच, कार्यक्रमानंतरही या सर्व समाजांच्या अडीअडचणी निवारण्यासाठी ते अहोरात्र कार्यरत आहेत.
त्याचाच एक प्रमुख भाग म्हणून, सिकलीगर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सिख कॉर्डिनेशन कमेटी महाराष्ट्र शासन समन्वयक श्री. रामेश्वरजी नाईक यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली ‘खालसा सिकलीगर सिख विकास प्रतिष्ठान’ने महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेऊन अभ्यास समितीची आग्रही मागणी केली होती. या मागण्यांची अत्यंत गांभीर्याने दखल घेत शासनाने सकारात्मक पावले उचलली असून शासन स्तरावर अभूतपूर्व हालचाली सुरू झाल्या आहेत.
मुंबईत उच्चस्तरीय बैठक संपन्न; ऐतिहासिक निर्णयांवर शिक्कामोर्तब
सिख कॉर्डिनेशन कमेटी महाराष्ट्र शासन समन्वयक श्री. रामेश्वरजी नाईक यांच्या थेट मार्गदर्शनाखाली मुंबईत ‘सिकलीगर समाज अभ्यास समिती’ची विशेष व उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी खालील महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले:
सहा महसुली विभागांचा टप्प्याटप्प्याने सखोल अभ्यास: महाराष्ट्रातील सर्व ६ महसुली विभागांतील सिकलीगर समाजाची वस्तूस्थिती आणि समस्या जाणून घेण्यासाठी दर दिवशी २ विभागांतील समाजाची विशेष अभ्यास बैठक आयोजित केली जाईल.
मुंबईत लवकरच भव्य उच्चस्तरीय बैठक: सिकलीगर समाजाच्या मागण्यांवर अंतिम धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मुंबईतील शासकीय बंगल्यावर सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची भव्य बैठक लवकरच पार पडणार आहे.
प्रमुख नेत्यांचे सहकार्य व उपस्थिती
या संपूर्ण व्यापक मोहिमेचे नियोजन व मार्गदर्शन श्री. जगदीशजी सकवान आणि श्री. रवींद्रजी राठोड यांच्या सक्रिय सहभागातून होत आहे. मुंबईत पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीस ‘खालसा सिकलीगर सिख विकास प्रतिष्ठान’चे अध्यक्ष हरनामसिंग चव्हाण व त्यांचे शिष्टमंडळ, तसेच ‘सिख सिकलीगर समाज संस्थे’चे अध्यक्ष तेजा सिंग बावरी विशेष रूपाने उपस्थित होते.
सिख कॉर्डिनेशन कमेटी महाराष्ट्र शासन समन्वयक श्री. रामेश्वरजी नाईक यांच्या दूरदृष्टीतून आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सिकलीगर समाजाला त्यांचा हक्क, न्याय व सन्मान मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. शासनाकडून सुरू झालेल्या या तातडीच्या कार्यवाहीमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील सिकलीगर व गुरु नानक नाम लेवा संगतीत प्रचंड उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

