ताज्या घडामोडी

वसमतचे ज्येष्ठ कंत्राटदार मो. नईम मो. गौस कुरेशी यांची हिंगोली जिल्हा मजूर सहकारी संस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड: नवघरे पाटील परिवाराकडून भव्य सत्कार

मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण

वसमतचे ज्येष्ठ कंत्राटदार मो. नईम मो. गौस कुरेशी यांची हिंगोली जिल्हा मजूर सहकारी संस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड: नवघरे पाटील परिवाराकडून भव्य सत्कार

लोकमंच टाईम्स:
वसमत शहरातील असंख्य कंत्राटदारांचे मार्गदर्शक व अनुभवी व्यक्तिमत्व मो. नईम मो. गौस कुरेशी यांची हिंगोली जिल्हा मजूर सहकारी संस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल वसमत येथे त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला.
आमदार राजुभैया नवघरे पाटील यांचे पिताश्री रमाकांत पाटील नवघरे व नवघरे परिवाराचे आधारस्तंभ लक्ष्मीकांतभैया नवघरे पाटील यांच्या हस्ते मो. नईम कुरेशी यांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. याच कार्यक्रमात महाराष्ट्र इंजिनिअर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष श्री. अमितकुमार काबरा यांचाही शाल व श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
मो. नईम कुरेशी यांच्या बिनविरोध निवडीमुळे वसमतसह संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून, मजूर संस्थांच्या बळकटीकरणासाठी व कंत्राटदारांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी त्यांचा अनुभव मोलाचा ठरेल, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.
प्रमुख उपस्थिती:
या स्नेहमयी सत्कार सोहळ्याला परिसरातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यामध्ये मोबीन दादा, लालासेठ उबारे, अझगरभाई पटेल, राजुदादा येंगडे, गौतमभाऊ वाहूळे, हरून दालवाले, वसन्तसेठ चेपुरवार, प्रमोद उबारे साहेब, शेख मजहर, मो. वसीम कुरेशी, वामन हिरवे, एन. आय. पठाण, कलीम भाई, जावेद भाई यांच्यासह परिसरातील नागरिक व कंत्राटदार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button