ताज्या घडामोडी

वसमत : सिद्धेश्वर व सती पांगरा जलस्रोतांनी गाठला तळ; नळाचे पाणी उकळून पिण्याचे नगराध्यक्ष सुनीताताई बाहेती यांचे आवाहन

हरनामसिंग चव्हाण

वसमत : सिद्धेश्वर व सती पांगरा जलस्रोतांनी गाठला तळ; नळाचे पाणी उकळून पिण्याचे नगराध्यक्ष सुनीताताई बाहेती यांचे आवाहन

वसमत (लोकमंच टाईम्स प्रतिनिधी) :
वसमत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सिद्धेश्वर धरण आणि सती पांगरा तलावातील जलसाठ्याने तळ गाठला आहे. परिणामी, जलस्रोतांमधून मोठ्या प्रमाणात गढूळ पाणी जलशुद्धीकरण केंद्राकडे येत असून, नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी पाणी उकळून पिण्याचे आवाहन वसमत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. सुनीताताई बाहेती यांनी केले आहे.
उपलब्ध जलस्रोतांची पातळी खालावल्याने शुद्धीकरण प्रक्रियेवर ताण आला आहे. सद्यस्थितीत स्रोतांतून येणारे गढूळ पाणी आवश्यक त्या प्रक्रियेनंतर शुद्ध करून पुरवठा करण्याचे काम नगरपरिषदेच्या माध्यमातून युद्धपातळीवर सुरू आहे. पाण्याची गुणवत्ता अबाधित राखण्यासाठी प्रशासन आणि संबंधित यंत्रणा आवश्यक ती तांत्रिक व प्रशासकीय कार्यवाही करत आहेत.
मात्र, जलस्रोतांची सद्यस्थिती आणि संभाव्य आरोग्याचा धोका लक्षात घेता, शहरातील सर्व नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून नळाद्वारे येणारे पाणी व्यवस्थित उकळून व गाळूनच प्यावे, असे स्पष्ट आवाहन नगराध्यक्षा सौ. सुनीताताई बाहेती यांनी केले आहे. तसेच, पाणीपुरवठा व शुद्धीकरणाच्या या महत्त्वाच्या टप्प्यात नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, अशी विनंतीही नगरपरिषदेतर्फे करण्यात आली आहे.

सविस्तर बातमीसाठी वाचा — लोकमंच टाईम्स (lokmanchtimes.in)

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button