वसमत येथे आषाढी पौर्णिमा व गुरुपौर्णिमेनिमित्त ‘विशेष वंदनीय देवपूजा प्रसाद वंदन सोहळा’ उत्साहात
मुख्यसंपादक: हरनामसिंग चव्हाण

वसमत येथे आषाढी पौर्णिमा व गुरुपौर्णिमेनिमित्त ‘विशेष वंदनीय देवपूजा प्रसाद वंदन सोहळा’ उत्साहात
वसमत (विशेष प्रतिनिधी):
सर्वतीर्थ श्री छिन्नस्थळी प्रसन्न आषाढी पौर्णिमा व गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून हिंगोली जिल्हा महानुभाव परिषदेच्या वतीने वसमत येथे दोन दिवसीय ‘विशेष वंदनीय देवपूजा प्रसाद वंदन सोहळ्याचे’ भव्य आयोजन करण्यात आले आहे.
हा सोहळा २९ व ३० जुलै २०२६ दरम्यान श्री कृष्ण मंदिर, शहर पेठ भोसले गल्ली, वसमत येथे संपन्न होत आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा व वेळ:
बुधवार, २९ जुलै २०२६: सकाळी ०७:०० ते रात्री०८:०० वाजेपर्यंत
गुरुवार, ३० जुलै २०२६: सकाळी ०७:०० ते दुपारी ०२:०० वाजेपर्यंत
भक्तांसाठी विशेष पर्वणी
आषाढी पौर्णिमेनिमित्त आयोजित या महत्त्वपूर्ण सोहळ्यात भक्तांना मुख्य वंदन तसेच विविध देवपूजा वंदनाचा प्रत्यक्ष लाभ घेता येणार आहे. आचार्यप्रवर म. श्री खेडकर बाबा कोठी महानुभाव आणि हिंगोली जिल्हा महानुभाव परिषदेचे अध्यक्ष प.पू.प.म. श्री संतराज बाबा विद्वांस यांच्या मार्गदर्शनाखाली व आयोजनाखाली हा सोहळा पार पडत आहे.
“गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम, अखंड वाहणारा झरा आणि विश्वासाचे प्रतीक.”
— गुरुपौर्णिमेच्या या पावन प्रसंगी आपल्या जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या सर्व गुरूंना कोटी कोटी प्रणाम व्यक्त करत, परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या वंदन सोहळ्याचा व प्रसादाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन हिंगोली जिल्हा महानुभाव परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
