ताज्या घडामोडी

शिक्षण संचालक महेश पालकर यांची अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालयाला भेट; उपक्रमांचे केले कौतुक!

मुख्य संपादक: हरनामसिंग चव्हाण

शिक्षण संचालक महेश पालकर यांची अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालयाला भेट; उपक्रमांचे केले कौतुक!

वसमत (लोकमंच टाईम्स ):
स्थानिक अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालय, वसमत येथे १ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे शिक्षण संचालक श्री. महेश पालकर यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी शाळेतील विविध शैक्षणिक उपक्रम आणि सुविधांची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व पूजन करून करण्यात आली.
या प्रसंगी शिक्षण संचालक श्री. महेश पालकर यांनी शाळेतील विद्यार्थिनींशी थेट संवाद साधत त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शाळेत राबवल्या जाणाऱ्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
या भेटीदरम्यान हिंगोली जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी श्री. विपुल भागवत, शिक्षणाधिकारी (योजना) श्री. संदीप सोनटक्के, वसमत पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी श्री. सतीश काष्टे, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती जाधव, केंद्रप्रमुख श्री. भारती, विद्यालयाचे अध्यक्ष प्रा. श्री. बी. डी. कदम, संस्थेचे सहसचिव श्री. संदीप कदम, मुख्याध्यापिका सौ. सरिता शिवाजी पतंगे, पर्यवेक्षिका श्रीमती शामल शिंदे, ज्येष्ठ शिक्षक श्री. मिटकर, श्री. हरी पठाडे, श्री. अशोक जऊळकर, श्री. राधाकिशन साबणे, श्री. संजय जाधव यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Share

मुख्य संपादक

‘लोकमंच टाईम्स’ हे मराठी भाषेतील एक विश्वासार्ह, निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे डिजिटल न्यूज पोर्टल असून सत्य, निष्पक्षता आणि लोकहित हीच त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. मुख्य संपादक हरनामसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकमंच टाईम्स स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि जनहिताच्या विषयांचे जबाबदारीने व तथ्याधारित वार्तांकन करत आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, जनभावना आणि समाजातील वास्तव परिस्थितीला प्रभावीपणे वाचा फोडणे हे या पोर्टलचे प्रमुख ध्येय आहे. निर्भीड पत्रकारिता, सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीच्या आधारे लोकमंच टाईम्स वाचकांचा विश्वास संपादन करत असून बदलत्या डिजिटल युगात वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांचे सक्षम व्यासपीठ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. "जनतेचा आवाज, सत्याची साथ" या मूल्यांना जपत समाजहितासाठी कटिबद्ध राहणे हीच लोकमंच टाईम्सची खरी ओळख आहे.
Back to top button